17 ऑगस्ट : राज्यातील अण्णा भाऊ साठे महामंडळात 141 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी जवळपास एक महिन्यापासून फरार असलेले राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार रमेश कदम यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या ग्रँड हयात हॉटेलमधून त्यांना सीआयडीने अटक केली आहे. सीआयडीने रमेश कदम यांना अटक केले असून हे पथक नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर करणार आहेत. त्यांच्याविरुद्ध मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सोलापूरच्या अण्णा भाऊ साठे महामंडळातील जवळपास 141 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी त्याच्यावर दहिसरमध्ये 18 जुलै रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून गेले 30 दिवस कदम फरार होते. तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यात यावं, यासाठी अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना करण्यात आली. मात्र यामध्ये रमेश कदमांनी कोट्यवधीचा घोटाळा केला असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, रमेश कदम याच्या अटकेसाठी पोलीस आणि CID कडून अनेक पथक स्थापन करण्यात आली होती. मात्र तरीही रमेश कदम याला अटक करायला एवढा वेळ का लागला, असा प्रश्न समोर येत आहे.
सीआयडीच्या अहवालातील मुद्दे
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |