सात तासांनंतर सोहमची बोअरवेलमधून सुखरुप सुटका

सात तासांनंतर सोहमची बोअरवेलमधून सुखरुप सुटका

  • Share this:

borewell kgf

06 ऑगस्ट : पुरंदर तालुक्यातल्या माळशिरसजवळच्या नायगावमध्यल्या एका बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याला तब्बल साडेसहा तासानंतर बाहेर काढण्यात यश आलं. सोहम यादव असं मुलाचं नाव आहे.

सोहमच्या वडिलांनी आपल्या शेतामध्ये पाण्यासाठी बोअरवेल घेतलं होत. मात्र बोअरला पाणी न लागल्याने त्यावर पोते टाकून ते बोअरवेल झाकण्यासाठी दगड आणायला गेले बाजूला गेले. त्यावेळी जवळच खेळता खेळता सोहम पोत्यावर बसायला गेला आणि 18 फूट खोलवर बोअरवेलमध्ये पडला. घटनेची माहिती मिळताच पुण्याच्या अग्निशमन दल आणि एनडीआरफ च्या टीमने धाव घेऊन गावकर्‍यांच्या मदतीनं सोहमला बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

दोन पोकलेन आणि जेसीबी यंत्राच्या सहाय्यानं गावकरी बचावकार्यासाठी धडपड करत होते. तर अग्निशमन दलाच्या पथकानं बोअरवेलमध्ये जाडजूड दोराच्या मदतीनं बचावकार्य सुरू ठेवलं होत. घटनास्थळी अंधार असल्यामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत होते. अखेर साडेसहा तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या पथकाला सोहमला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं.

दरम्यान घाबरलेल्या अवस्थेतल्या सोहमला बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर प्रथम उपचारासाठी सासवडच्या चिंतामणी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला पुण्यातील केईएम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. चिमुकल्या सोहमची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 6, 2015, 11:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading