एक्स्प्रेस वे जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

एक्स्प्रेस वे जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

  • Share this:

mumbai pune express way jam25 जुलै : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सुरू असलेल्या दुरस्तीच्या कामामुळे आज वाहतुकीवर परिणाम झालाय. एक्स्प्रेस वे 10 ते 15 किलोमिटरच्या रांगा लागल्या आहे. त्यामुळे प्रवाशांचे ऐन विकेंडच्या दिवशी हालहाल झाले आहे. अनेक प्रवाशी सकाळपासून एक्स्प्रेस वेवर लटकले आहे. दरम्यान, एक्स्प्रेस वेवर आता मुंबईला जाणार्‍या दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या केल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात मुंबईकडे जाणारी वाहतूक संथगतीने का होईना सुरू झालीये.

18 जुलै रोजी आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे दहा दिवस एक्स्प्रेस वेवर डागडुगीचं काम हाती घेण्यात आलंय. दहा दिवस एक्स्प्रेस वेवर वाहतुकीवर परिणाम होणार हे स्पष्ट होते. अखेर आज डागडुगीच्या दुसर्‍या दिवशी आणि ऐन विकेंडच्या दिवशीच वाहतूक कोंडी झालीये. एक्स्प्रेस वे आज पहाटेपासूनच जाम आहे. मुंबईकडे जाणारी वाहतुकीवर याचा परिणाम झालाय. तर पुण्याकडे जाणारी वाहतूक अतिशय संथ गतीनं सुरू आहे. लोणावळ्यानंतर येणार्‍या आडोशी बोगद्यापासून ते कुसगाव टोलनाक्यापार्यंत तब्बल 10-15 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्यात. जुन्या महामार्गावरची वाहतूकही संथ गतीनं सुरू आहे. हजारो लोक या कोंडीत अडकलेत. वाहतूक पोलिसांकडून कोणतीही आगाऊ सूचना न मिळाल्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होतायत.

(संग्रहित छायाचित्र)

Follow @ibnlokmattv

First published: July 25, 2015, 1:46 PM IST

ताज्या बातम्या