S M L

निगडीत भरधाव कारच्या धडकेत 3 तरुणांचा मृत्यू, 2 जखमी

Samruddha Bhambure | Updated On: Jul 22, 2015 02:23 PM IST

निगडीत भरधाव कारच्या धडकेत 3 तरुणांचा मृत्यू, 2 जखमी

22 जुलै : मुंबई-पुणे मार्गावरील निगडी नाक्याजवळ भरधाव कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन विद्यार्थी ठार तर दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. काल रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला असून जखमींवर पिंपरीतल्या यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन्ही दुचाकीवरील तरुण रात्री उशीरा घरी परतत असताना निगडी नाक्याजवळ मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या कारने दोन्ही दुचाकींना मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की बाईकवरच्या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तातडीने स्थानिक लोकांनी मदत करत जखमी तरुणांना रुग्णालयात नेले. पोलीसांनी मोटार चालकाला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, पुणे ते देहू या रस्त्यावर 6 किमीचा एक पट्टा आहे, तिथे रस्ता अतिशय अरुंद आहे. आतापर्यंत 100पेक्षा जास्त अपघात या पट्‌ट्यात झाले असून हा अपघातही इथेच झाला आहे.

Loading...
Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2015 08:46 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close