S M L

वर्गात शिक्षकाची डुलकी, उठवलं म्हणून विद्यार्थिनीच्या कानाखाली लगावली

Samruddha Bhambure | Updated On: Jul 9, 2015 02:33 PM IST

वर्गात शिक्षकाची डुलकी, उठवलं म्हणून विद्यार्थिनीच्या कानाखाली लगावली

09 जुलै : शाळा सुरू असताना वर्गात झोपलेल्या शिक्षकाची झोपमोड विद्यार्थीनीला मारल्याची संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यातील कवठे येमाइच्या माळवदे वस्तीच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील प्रकार घडला आहे.

दुसरीत शिकणार्‍या 7 वर्षांच्या सानिका माळवदेला तिच्या शिक्षकानं झोपेतून उठवलं म्हणून कानफाडात मारली आहे. काल (बुधवारी) दुपारी 3 वाजता घटना घडली आहे. यामुळे चिमुकलीच्या कानाला आणि गालाला गंभीर दुखापत झाली. सानिकावर सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.दरम्यान, शिक्षक संजय बागलेवर गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. मगणी मान्य न झाल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Loading...
Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2015 02:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close