22 जून : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर खंडाळा घाटातल्या बोगद्याजवळ दरड कोसळल्याने या मार्गावरची वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वळवण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून लोणावळ्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यातच आज (सोमवारी) सकाळी खंडाळा घाटात मुंबईकडे जाणार्या मार्गावर दरड कोसळल्याने या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वळवण्यात आली आहे.
दरड बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी ही घटना घडल्याने महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला असून, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी अनेक तास लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Follow @ibnlokmattv |