जमिनीच्या वादातून माजी मंत्री थोपटेंची महिलांना शिवीगाळ

जमिनीच्या वादातून माजी मंत्री थोपटेंची महिलांना शिवीगाळ

  • Share this:

thopte 418 जून : पुणे जिल्ह्यातील भोरचे काँग्रेसचे ज्येष्ठ  माजी आमदार आणि माजी शिक्षण  मंत्री अनंतराव थोपटे यांनी जमिनीच्या वादातून महिलांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना उजेडात आलीये. आमदार थोपटे महिलांना शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय.

या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही बाजूंच्या तक्रारी दाखल करण्यात आल्यात. अनंतराव थोपटे यांच्यासह पाच जणांच्या विरोधात राजगड ग्रामीण पोलीस ठाण्यात महिलांना मारहाण करून त्यांचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

न्यायालयीन वाद सुरू असलेल्या शेतात महिला काही कामासाठी गेल्या होत्या त्या महिलांना थोपटे यांनी शिवीगाळ आणि मारहाण केली. या महिलेच्या नातेवाईकांनी हा सगळा प्रकार कॅमेर्‍यात कैद केला. मात्र, या व्हिडिओमध्ये मी नाहीच असा दावाच अनंत थोपटे यांनी केलाय. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मी आमच्या संस्थेच्या मिटींगमध्ये होतो असं त्यांनी सांगितलंय.

Follow @ibnlokmattv

First published: June 18, 2015, 5:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading