कॉ.पानसरेंच्या हत्येच्या तपासासाठी 27 पथकांची केली आठ पथकं

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2015 06:37 PM IST

pansare new

07  जून : कॉम्रेड गोविंद पानसरे खून प्रकरणी तपास पथकांची पुनर्रचना करण्यात आली आहे. एकूण 27 पथकं याप्रकणाचा तपास करत होती. आता 8 पथकं तयार करून त्यांना तपासाच्या दिशा ठरवून देण्यात आल्या आहेत.

पथकात राज्यातल्या अनुभवी अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेल्या मोटर सायकलचं गूढ उकलण्याचा प्रयत्न केला जातोय. पानसरेंवरील हल्ल्यानंतर मारकर्‍यांनी वापरलेली मोटारसायकल दूधगंगा नदीत सापडली होती. तर ही मोटारसायकल कोल्हापुरातून चोरीला गेली होती आणि हेच वाहन हल्लेखोरांनी हल्ल्यात वापरलं होतं. या मोटारसायकलचा 7हजार किलोमीटरचा प्रवास झालेला होता. ही गाडी कोणी वापरली, कुठे गेली होती, याचा तपास सुरू आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2015 06:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...