S M L

बोपखेल गावात जमावबंदी, 400 गावकरी पोलिसांच्या ताब्यात

Sachin Salve | Updated On: May 22, 2015 01:40 PM IST

pimpri 34534522 मे : पिंपरी चिंचवडमध्ये बोपखेल गावात लष्कर आणि गावकर्‍यांमध्ये रस्त्याच्या वाद आणखी चिघळलाय. गुरुवारी पोलीस आणि गावकर्‍यांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. त्यामुळे आता गावात जमावबंदी लागू करण्यात आलीये. आतापर्यंत 200 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 74 महिला 80 पुरुष,13 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आलीये.

18 नागरिकांना एक दिवसांची पोलीस कोठडी तर 150 पुरुष आणि महिलांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलीये. पिंपरी चिंचवड शहरातील बोपखेल गावच्या ग्रामस्थांमध्ये गुरुवारी तुफान संघर्ष झाला. त्यावेळी ग्रामस्थांनी पोलीस आणि लष्करांवर दगडफेक केली होती.

तब्बल 185 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागरिकांवर बेकायदा जमाव जमवून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, सरकारी कामात अडथळा आणि न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2015 01:40 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close