भाजपकडून राज्यसभेसाठी अमर साबळे यांना उमेदवारी

भाजपकडून राज्यसभेसाठी अमर साबळे यांना उमेदवारी

  • Share this:

amar sabale10 मार्च : पिंपरी चिंचवड परिसरातील भाजपचे जेष्ठ नेते अमर साबळे यांच्या राज्यसभेच्या खासदारपदी वर्णी लागली आहे.

अमर साबळे गेली 15 वर्षा पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. याशिवाय, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवडमधून अर्जही भरला होता. मात्र, जागावाटपात भाजपाने ती जागा रामदास आठवले यांच्या आरपीआयला दिली होती. त्यामुळे आता परतफेड म्हणून अमर साबळेंना राज्यसभेत पाठवत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता मिळालेल्या खासदार पदामुळे पक्षाने आपल्या 15 वर्षाच्या कामगिरीची पावती दिल्याची भावना साबळे यांनी वेक्त केली आहे

Follow @ibnlokmattv

First published: March 10, 2015, 10:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading