S M L

स्थायी समिती निवडणुकीत नवा 'पुणे पॅटर्न'

Samruddha Bhambure | Updated On: Mar 5, 2015 01:28 PM IST

स्थायी समिती निवडणुकीत नवा 'पुणे पॅटर्न'

05 मार्च :  काँग्रेस आणि मनसेच्या सदस्यांनी केलेल्या मदतीमुळे पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी आज (गुरुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी कदम यांची निवड झाली. त्यांनी भाजपच्या नगरसेविका मुक्ता टिळक यांचा पराभव केला. दरम्यान या निवडणुकीमुळे पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांच्या युतीचा नाव पॅटर्न पाहायला मिळाला.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने स्वतंत्र उमेदवार उभे केल्यामुळे या निवडणुकीकडे पुण्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. पण काँग्रेसचे चंद्रकात कदम यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि अश्विनी कदम आणि भाजपच्या मुक्ता टिळक यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेच्या सदस्यांनी अश्विनी कदम यांच्या बाजूने मतदान केले, तर शिवसेनेने भाजपची साथ दिली. राष्ट्रवादी आणि कौंग्रेस या दोन्ही सदस्यांनी केलेल्या मतदानाच्या आधारेही अश्विनी कदम विजयी ठरल्या असत्या. पण मनसेनेही त्यांच्या पारड्यात मत टाकल्याने आश्चर्य व्यक्त होता आहे. त्यावर, नाशिकमध्ये राष्ट्रवादीने मदत केल्यामुळेच पुण्यामध्ये परतफेड केल्याची स्पष्ट कबुली मनसेचे पालिका गटनेते बाबु वागसकर यांनी दिली आहे. तर मनसेची भुमिका काय राहणार आहे यावर काँग्रेस इथुन पुढे भुमिका ठरवेल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे पालिका गटनेते अरविंद शिंदेंनी दिली आहे.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 5, 2015 01:28 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close