भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई केली तर खातं कसं चालवायचं? -महाजन

भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई केली तर खातं कसं चालवायचं? -महाजन

  • Share this:

mahajan226 फेब्रुवारी : जर भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई करतच राहिलो तर विभागात काम करण्यास कुणीही शिल्लक राहणार नाही, मग खातं कसं चालवायचं?, अशामुळे पाटबंधारे खात्यांचं नाव बदलून निलबंन खातं असं करावं लागेल असं वादग्रस्त वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. ते पुण्यात बोलत होते.

पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात गिरीश महाजनांनी आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. जलसंपदा खात्यात पूर्वीच्या सरकारनं मोठा भ्रष्टाचार केलाय, असा आरोप महाजन यांनी केलाय. परंतु, आघाडी सरकारवर आरोप करतांना महाजनांनी एका प्रकारे भ्रष्ट अधिकार्‍यांची पाठराखण करणारं वक्तव्य केलंय. भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी होत असते, मात्र, कारवाई करायचं ठरलं तर मंत्रीही असतील, त्या अधिकार्‍यांवर काय कारवाई करायची असेल तर ती होईल परंतु असं जर चालत राहिलं तर खातं चालवायचं कसं ?, पाटबंधारे खातं नाही तर निलंबन खातं असं नामकरणच करावं लागेल. एवढा मोठा भ्रष्टाचार या खात्यात झालाय असं वक्तव्य महाजनांनी केलं. ते पुढे म्हणाले, कोकण महामंडळामध्येही असाच भ्रष्टाचार झालाय. सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, कोकणातही असे प्रकार झाली एक-एका प्रकारणाच्या सात-सात फाईली टेबलावर फिरत होत्या असा खुलासाही महाजनांनी केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2015 09:18 PM IST

ताज्या बातम्या