मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे -ओवेसी

मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे -ओवेसी

  • Share this:

mim asaduddin owaisiपुणे (04 फेब्रुवारी ): राज्यात सनदी अधिकारी, सरकारी नोकर्‍यांमध्ये मुस्लीम नाहीत. राज्यात फक्त 11 टक्के मुस्लिमांची संख्या आहे. पण तरीही राज्य सरकारने मुस्लिमांना काय दिलं ?, चांगल्या शिक्षणासाठी, मुस्लीम तरुणांच्या विकासासाठी मुस्लीम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी एमआयएमचे नेते असादुद्दीन ओवेसी यांनी केली. तसंच मी भडकाऊ भाषण देत असेल तर माझ्याशी वाद घाला. 100 जणांना मी, एकटा उत्तर देईन असं आव्हानही त्यांनी विरोधकांना दिलं.

एमआयएम अर्थात मजलिस-ए इत्तहदुल मुस्लिमीन संघटनेचे नेते असादुद्दीन ओवेसी यांची पुण्यातील सभा सशर्त अटीवर पार पडली. मूल निवासी मंच आणि ऍक्शन फॉर महाराष्ट्र यांनी कौसरबाग येथील बंद हॉलमध्ये ओवेसींची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ओवेसी यांनी चौफेर टीका केली. आम्ही देशभक्त मुस्लीम आहोत पण आमच्याविरोधात गैरसमज पसरवला जात आहे. सरकारने हे वेळीचं थांबवलं पाहिजे. राज्यात आज मुस्लिमांची संख्या फक्त 11 टक्के इतकी आहे. मुस्लीम मुलांनी शिक्षण घेऊन डॉक्टर, सनदी अधिकारी झालं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसंच गेल्या 15 वर्षांच्या काळात राज्यात एकही मुस्लीम आयएएस अधिकारी नव्हता याबद्दल नाराजी व्यक्त केली. बॉम्बस्फोटांच्या खटल्यात मुस्लीम तरुणांना विनाकारण गोवले जाते. त्यांच्यावर कित्येक वर्ष खटले चालूच राहतात. जे काही सत्य आहे त्याचा योग्य निकाल लावला गेला पाहिजे. काय पुरावे आहेत ते तपासून पाहिले पाहिजे अन्यथा त्यांना सोडून द्या अशी मागणीही त्यांनी केली. तसंच अमित शहांना सोहराबुद्दीन केसमध्ये क्लीन चीट मिळते मग, मालेगाव ब्लास्टमध्ये अटक केलेल्यांना जेलमध्ये का ठेवलंय ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ओवेसींच्या भाषणातील मुद्दे

- महाराष्ट्रात मुस्लिम आरक्षण मिळालंच पाहिजे

- मुस्लिम मुलं डॉक्टर, आयपीएस झाली पाहिजेत

- 'सबका साथ सबका विकास' घोषणा दिल्या मग आरक्षण कधी देणार ?

- 15 वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार पण एकही मुस्लीम आयएएस अधिकारी नाही

- मी भडकाऊ भाषण देतो तर माझ्यासोबत डिबेट करा.

- 100 लोकांनी या मी एकटा उत्तर देईन

- अमित शहांना सोहराबुद्दीन केसमध्ये क्लीन चीट मिळते मग, मालेगाव ब्लास्टमध्ये अटक केलेल्यांना जेलमध्ये का ठेवलंय ?

- काय पुरावे आहेत खटले चालवा अन्यथा सोडा

Follow @ibnlokmattv

First published: February 4, 2015, 9:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading