सुट्टीचा घोळ सुरूच, संजूबाबा आणखी 14 दिवस जेलबाहेर ?

सुट्टीचा घोळ सुरूच, संजूबाबा आणखी 14 दिवस जेलबाहेर ?

  • Share this:

sanjay_dutt4509 जानेवारी : अभिनेता संजय दत्तच्या सुट्टीवर सावळा गोंधळ सुरूच आहे. फर्लोची रजा संपल्यांनतरही संजय दत्त जेल बाहेरच असून जर हा गोंधळ संपला नाहीतर तो आणखी 14 दिवस  जेलबाहेर राहु शकतो. आणखी १४ दिवसांनंतर जर तो जेलमध्ये हजर झाला नाही तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी होऊ शकतं.

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त पुन्हा 14 दिवसांच्या फर्लो रजेवर बाहेर आला, पण आत जाण्याचं काही नाव घेईना. संजय दत्तची 14 दिवसांची फर्लो गुरुवारीच संपलीये. पण तो जेलमध्ये परतला नाहीय. डीआयजी राजेंद्र धामणे यांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत संजय दत्तचा पोलीस रिपोर्ट येत नाही तोवर त्याचा फर्लो मंजूर करता येणार नाही. त्यामुळे संजय दत्तच्या फर्लोवर अजून निर्णय झालेला नाही. पण सरकारी नियमानुसार संजय दत्त जोवर फर्लोवर निर्णय होत नाही तोवर बाहेर राहू शकतो. असे अजून 14 दिवस तो बाहेर राहू शकतो आणि जर 28 दिवसांत तो हजर झाला नाही तर 29 व्या दिवशी त्याच्याविरोधात अटक वॉरंट निघू शकतं. त्यामुळे सरकारी यंत्रणांचा सावळा गोंधळ उघड झालाय. ज्या 14 दिवसांसाठी संजय दत्तनं अर्ज केलाय तितकाच कालावधी म्हणजे आणखी 14 दिवस तो फर्लो मंजूर न होताही बाहेर राहू शकतो. त्यामुळे या सर्व प्रकाराबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2015 10:25 PM IST

ताज्या बातम्या