भाजपचं घूमजाव, टोलमुक्त महाराष्ट्राचं आश्वासन दिलं नव्हतं !

भाजपचं घूमजाव, टोलमुक्त महाराष्ट्राचं आश्वासन दिलं नव्हतं !

  • Share this:

tawade_on_toll08 जानेवारी :एलबीटीपाठोपाठ आता टोलच्या मुद्द्यावरही भाजप सरकारने घूमजाव केलंय. आम्ही पूर्ण टोल बंद करण्याचं आश्वासन दिलं नव्हतं, असा दावा आता मंत्री विनोद तावडे यांनी केलाय. ते पुण्यात बोलत होते.

सत्तेवर आल्यावर राज्य टोलमुक्त करणार असं जाहीर आश्वासन भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. एवढंच नाहीतर भाजपने आपला जाहीरनामा दृष्टीपत्रातूनही टोलमुक्त महाराष्ट्र करणार असं आश्वासन दिलं होतं. पण आता भाजपने यू टर्न घेतलाय. आम्ही पूर्ण टोल बंद करण्याचं आश्वासन दिलं नव्हतं,अन्यायकारक टोल बंद करणार असं आश्वासन दिलं होतं अशी सारवासारव शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलीये. पुण्यात त्यांना टोलबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीये. निवडणुकीपूर्वी टोल बंद करू असं आश्वासन देऊन भाजपनं मत मागितली होती. आता मात्र मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेते या प्रश्नाला सोयीस्कररित्या बगल देताना दिसत आहे. टोलबाबतच्या समितीच्या अहवालानंतर मगच निर्णय घेण्यात येईल, असंही तावडेंनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे मागील महिन्यात एलबीटीबाबतही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एलबीटी रद्द होणार नाही असं स्पष्ट केलं होतं. आता एलबीटीनंतर टोलबाबतही भाजप सरकारने घूमजाव केलंय.

Follow @ibnlokmattv

First published: January 8, 2015, 8:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading