मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर उलटल्याने वाहतुकीची कोंडी

 मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर उलटल्याने वाहतुकीची कोंडी

  • Share this:

eway07  जानेवारी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज (बुधवारी) सकाळी काँक्रिट मिक्सर ट्रक उलटल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. या अपघातामुळे मुंबईकडे येणारी सर्व वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी काही तास लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

खंडाळा घाटानजीक असणाऱ्या अमृतांजन पुलावर हा विचित्र अपघात झाला. मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी काँक्रिट मिक्सर ट्रक उलटला. या ट्रकला उचलण्यासाठी जी क्रेन मागविण्यात आली होती तीदेखील उलटल्याने महामार्गावरील वाहतुकीचे तीनतेरा वाजले. या अपघातानंतर एक्स्प्रेस वेवरची सर्व वाहतूक जुन्या मार्गाने वळविण्यात आली आहे.

या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तसंच जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक संथ गतीने पुढे सरकत असून ती पूर्ववत होण्यास आणखी काही तासांचा कालावधी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Follow @ibnlokmattv

First published: January 7, 2015, 9:30 AM IST

ताज्या बातम्या