S M L

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तिहेरी अपघात; वाहतुकीचा खोळंबा

Samruddha Bhambure | Updated On: Dec 26, 2014 12:38 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तिहेरी अपघात; वाहतुकीचा खोळंबा

[wzslider autoplay="true"]

26 डिसेंबर :  खंडाळा घाटात तीन बसेस एकमेकांवर आदळल्याने मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुक खोळंबली आहे. अपघातामध्ये 7-8 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी नेण्यात आले आहे.

या अपघातामुळे वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला आहे. सध्या मुंबईकडे येणारी सर्व वाहतूक जुन्या मुंबई - पुणे हायवे वर वळवण्यात आल्याने जुन्या रस्त्यावर 7-8 किलोमीटरच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.


मंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मागच्याचं आठवड्यात 2 वेळा एक्स्प्रेस वेवर टॅक पेटल्याच्या घटनांमुळे प्रवाश्यांना बराच वेळ ट्राफिक जामचा सामना करावा लागला होता.

आज पुन्हा एक या तिहेरी अपघातामुळं मुंबई-पुणे एक्सप्रेसवर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2014 11:46 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close