दाभोलकरांच्या हत्येला 16 महिने पूर्ण, अजूनही मारेकरी मोकाटच

  • Share this:

dabholkar44420 डिसेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज16 महिने पूर्ण झाले आहेत. पण अजूनही हल्लेखोर मोकाटाच आहे.

दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना अटक करण्यात पोलिसांनी सपशेल अपयश आलंय. एवढंच नाही तर हत्येप्रकरणात साधे धागेदोरेही पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

आरोपींना अटक व्हावी या मागणीसाठी डॉक्टरांची जिथं हत्या झाली त्या पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळच्या पुलावर आज अनिसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष सदानंद मोरे हे निदर्शनामध्ये सहभागी झाले होते. दर महिन्याच्या 20 तारखेला या पुलावर निदर्शनं करण्यात आली.

Follow @ibnlokmattv

First published: December 20, 2014, 1:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading