पुण्यात गँगवॉर, गोळीबारात 1 ठार

पुण्यात गँगवॉर, गोळीबारात 1 ठार

  • Share this:

pune_firing29 नोव्हेंबर : सांस्कृतिक राजधानी पुण्यात आज गँगवॉरच्या घटनेनं खळबळ उडाली. वैकुंठ स्मशानभूमीजवळ भर दुपारी गोळीबाराची घटना घडलीये. या गोळीबार एकाचा मृत्यू झालाय. अमोल बधे असं या मृताचं नाव आहे. दुपारी 4 वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी बधे याच्यावर गोळीबार केला यात बधेसह त्याचे दोन मित्र जखमी झाले. अमोल बधेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी अमोल बधे आणि त्याचे दोन मित्र आले होते. अंत्यविधी आटोपल्यानंतर हे तिघे जण बाहेर पडले. त्याचवेळी एका कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी अमोल बधेवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी बधेवर दोन राऊंड फायर केले. त्याला वाचवण्यासाठी दोघे जण पुढे धावले असता हल्लेखोरांनी त्यांच्यावरही गोळीबार केला. यात दोघेही जखमी झाले. तिघांना अगोदर ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तर अमोलची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गँगवॉर प्रकरणातून गोळीबार झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधिक तपास करत आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2014 07:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...