S M L

बालदिनी वैदेही रेड्डीचं 'डुडल' झळकणार 'गुगल'च्या होम पेजवर

Samruddha Bhambure | Updated On: Nov 13, 2014 01:18 PM IST

बालदिनी वैदेही रेड्डीचं 'डुडल' झळकणार 'गुगल'च्या होम पेजवर

[wzslider]

13  नोव्हेंबर : यंदाच्या बालदिनी 'गुगल'च्या होमपेजवर झळकणारं 'डुडल' पुण्यातील वैदेही रेड्डीचं असणार आहे. दरवर्षी 'गुगल'तर्फे 'डुडल फॉर गुगल' ही स्पर्धा देशभरातल्या 50 शहरांमधील 1700 शाळांमध्ये घेण्यात येते. या स्पर्धेत लाखो विद्यार्थी सहभागी होता. यांदाची ही स्पर्धा नववीत शिकणार्‍या वैदेही रेड्डीने जिंकली आहे. सलग दुसर्‍या वर्षी पुण्यातली विद्यार्थिनीनंच गुगल डुडलची स्पर्धा जिंकली आहे.

वैदेहीने नॅचरल ऍण्ड कल्चरल पॅराडाईझ-आसाम' म्हणजेच 'नैसर्गिक आणि सांस्कृतिक स्वर्ग - आसाम' अशी संकल्पना घेऊन डुडल तयार केले आहे. त्यात आसामची ओळख असलेला एकशिंगी गेंडा, आसामी नृत्य आणि बांबू अश्या चित्रांचा समावेश आहे. त्यामुळे देशभरातील नागरीकांना उद्या शुक्रवारी आसामची वैशिष्ट्य गुगलच्या डुडलद्वारे पाहायला मिळणार आहेत. वैदेही तिसरीत असल्यापासूनच चित्र काढते. गुगलच्या या स्पर्धेमुळे देशभरात पोहोचण्याची संधी मिळाल्याचे वैदेहीने सांगितले. ती म्हणाली, 'मी सुट्टीच्या काळात आसामला गेले होते. मला तो भाग खूप आवडला होता. त्यामुळे या स्पर्धेसाठी आसामवरच डुडल तयार करण्याचे मी ठरवले.'गुगल डुडल या स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे. वैदेहीने तयार केलेले डुडल बालदिनाच्या दिवशी (14 नोव्हेंबर) गुगल इंडियाच्या होमपेजवर दिसणार आहे.Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 13, 2014 10:26 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close