गणेश विसर्जनासाठी वाहतुकीच्या मार्गात बदल

गणेश विसर्जनासाठी वाहतुकीच्या मार्गात बदल

 • Share this:

Ganpati in traffice

08 सप्टेंबर :   शहरात गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. आज सोमवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाहतूक पोलीस विविध चौपाट्यांवर तैनात आहेत.

गणेशविसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज झालेत. साडेतीन हजार पोलीस, 11 हजार स्वयंसेवक, ट्रॅफिक पोलीस आणि जवळपास दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे विसर्जन निर्विघ्न पार पडावं, यासाठी तैनात असतील. त्याशिवाय 49 रस्ते वाहतुकीसाठी बंद असून 95 रस्त्यांवर पार्किंगला मनाई केली आहे. 13 रस्त्यांवरती जड वाहनांच्या वाहतुकीस पूर्णत: बंदी घातली आहे. एवढेच नव्हे तर ठिकठिकाणी पोलीस सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून विसर्जन सोहळ्यावर लक्ष ठेऊन आहेत.

मुंबई-पुण्यात गणेश विसर्जन सोहळा बघण्यासारखा असतो. मुंबईत पाच चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात विर्सजन होत असतं. यामुळे या चौपाट्यांच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यांवर तर जनसागर लोटला असतो त्यामुळे वाहतुकीचं खास नियोजन करण्यात आलंय.

मुंबईतील वाहतुकीचं नियोजन

- 49 रस्ते बंद करण्यात आलेत.

- 55 रस्ते एक दिशा मार्ग करण्यात आलेत.

- 95 रस्त्यांवर नो पार्किंग आहे.

- 13 रस्त्यांवर जड वाहनांना बंदी करण्यात आलीय

[wzslider]

पुण्यातील गणपती विसर्जनाचा मार्ग

1.मानाचा पहिला कसबा गणपती

 • सकाळी 8.30 ला मंडळाच्या सभामंडपातून निघाला
 • 10.30 वाजता लक्ष्मी रस्त्याने 2.30 वाजता अलका चौकात येईल आणि लगेच विसर्जन होईल

2. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी

 • चांदीच्या पालखीतून सकाळी 9.00 वाजता सुरुवात, 10.30 वाजता विसर्जन मिरवणुकी बरोबर अलका चौकात

3. मानाचा तिसरा गुरुजी तालीम

 • फुलांच्या रथात विराजमान बाप्पांची मिरवणूक 9.30 ला सुरू
 • 10.30 मुख्य मिरवणुकीत टिळक पुतळा येथून, दुपारी अलका चौकात आगमन, नंतर मुठा नदीत विसर्जन

4.मानाचा चौथा तुळशीबाग गणपती

 • विविध फुलांनी सजविलेला मयूर रथात विराजमान 25 फुटांची श्रींची मूर्ती भाविकांच खास आकर्षण
 • अनेक पथकं सामील, मुलांचं मल्लखांब प्रात्यक्षिक
 • 10.30 ला टिळक पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
 • दुपारी अलका चौकात आमगन आणि नंतर विसर्जन

5.मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती

 • टिळक पुतळ्यापासून 11 वाजता मिरवणुकीला सुरुवात
 • लक्ष्मी रस्त्याने मिरवणूक अलका चौक येथे
 • दुपारी 3 पर्यंत येईल आणि नंतर विसर्जन केल जाईन
 • यावर्षी लोकमान्य टिळकांच्या मंडाले तुरुंगातून सुटकेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत, यानिमित्ताने मंडळाने चित्ररथ साकारलाय

Follow @ibnlokmattv

First published: September 8, 2014, 8:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading