पुण्यात इंजिनिअरींगचे सात हजार विद्यार्थी नापास

पुण्यात इंजिनिअरींगचे सात हजार विद्यार्थी नापास

  • Share this:

5519530607441204766_Mid

28 ऑगस्ट : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने इंजिनिअरींगच्या उत्तरपत्रिका चुकीच्या पध्दतीने तपासल्यामुळे जवळपास सात हजार विद्यार्थी परिक्षेत नापास झाले आहेत. याविरोधात आवाज उठवत इंजिनिअरींगच्या विद्यार्थी विद्यापीठासमोर आठ दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं इंजिनिअरींगच्या उत्तरपत्रिका चुकीच्या पद्धतीनं तपासल्यानं जवळपास सात हजार विद्यार्थी परिक्षेत नापास झालेत. या विरोधात विद्यार्थी विद्यापीठासमोर आठ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. इंजिनिअरींगच्या उत्तरपत्रिका कशाप्रकारे तपासण्यात आल्या याचे अनेक पुरावे कुलगुरूंना दिल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. इंजिनिअरींग विभागाच्या उत्तरपत्रिका कशा प्रकारे तपासण्यात आल्या याचे अनेक पुरावे विद्यार्थ्यांनी कूलगूरूना दिले आहेत. मात्र विद्यार्थी विद्यापीठाची दिशाभूल करत आहेत अस कुलगूरू वासूदेव गाडे याचं म्हणणं आहे.

Follow @ibnlokmattv

First published: August 28, 2014, 9:55 AM IST

ताज्या बातम्या