शाईफेक प्रकरणामागे कोण ?, कसून चौकशी व्हावी -पाटील

  • Share this:

h patil 409 ऑगस्ट : शाईफेक या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणामागे नेमकं कोण आहे, हा पूर्वनियोजित कट होता का याचा शोध लागला पाहिजे. कारण नुसती शाई फेकली गेली नाहीतर ते केमिकल होतं. त्यामुळे याचा योग्य तपास व्हावा अशी मागणी खुद्ध सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलीय.

या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांना उद्या पत्र लिहणार आहे असंही पाटील यांनी सांगितलं. हर्षवर्धन पाटील यांना आज (शनिवारी) संध्याकाळी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी आयबीएन लोकमतशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. यावेळी त्यांनी ही मागणी केली.

शुक्रवारी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्यावर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या डोळ्याला इजा झाली. शाईच्या बाटलीत केमिकल होतं असं कालच पाटील यांनी सांगितलं होतं. तर हा पूर्वनियोजित कट होता असा संशय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला होता. आज पाटील यांना डिस्चार्ज मिळाला असून डोळ्याला अजून सुज असून डोळ्याखाली इजा झाली आहे असं पाटील यांनी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2014 09:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading