S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

'माळीण' दुर्घटनेत मृतांचा आकडा 41 वर

Sachin Salve | Updated On: Jul 31, 2014 11:04 PM IST

malin1331 जुलै : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावात डोंगरकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेला 36 तास उलटले आहेत. बचावकार्य अजूनही युद्धपातळीवर सुरू आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर 8 जणांना वाचवण्यात बचावपथकाला यश आलंय. आणखी 150 जण या ढिगाराखाली दबले गेले असल्याची भीती व्यक्त व्यक्त होत आहे.

पण माळीणगावात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे. या दुर्घटनेत अनेकांवर दु:खाचं डोंगर कोसळलंय.


बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास डोंगरकडा कोसळून माळीण गाव ढिगाराखाली गाडलं गेलं. ढिगाराखाली 44 घरं दबली गेलीय. अवघ्या 5 मिनिटांत घडलेल्या या अस्मानी संकटामुळे होत्याचं नव्हतं झालं. अनेकांची संसार उद्‌ध्वस्त झालीय. अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलंय. त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.

अजून दोन दिवस हे बचावकार्य सुरूच राहणार आहे. त्यानंतर बैठक घेऊन पुनर्वसन आणि मदतीचा आढावा घेतला जाईल असं मदत आणि पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी स्पष्ट केलं. आज घटनास्थळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देऊन दुख व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2014 09:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close