आऊटलूक आणि खेतानवर ठोकणार100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा-पोळ

आऊटलूक आणि खेतानवर ठोकणार100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा-पोळ

  • Share this:

gulabrao pol

21   जुलै :   डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपासासाठी प्लँचेटचा वापर केल्याचा आरोप पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी फेटाळला आहे. याचबरोबर पोळ यांनी या खोट्या आरोपांमुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून, आरोप करणारे आऊटलूक मासिकाचे लेखक-पत्रकार आशिष खेतान यांनी जाहीर माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोळ यांच्या वकिलाने म्हटलं आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 11 महिने पूर्ण झाले आहेत. पण अजूनही त्यांच्या मारेकर्‍यांना अटक झालेली नाही. या खुनाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी प्लँचेटचा वापर केल्याचं आशिष खेतान यांनी आऊटलूक मासिकात लिहिलेल्या लेखात म्हटलं होतं. हा लेख फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी लिहिण्यात आला असून याविषयी फौजदारी तक्रार दाखल करणार आहेत. तसचं आऊटलूक आणि आशिष खेतान यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचंही पोळ यांच्या वकिलाने सांगितलं आहे.

आयुष्यभर अंधश्रद्धेविरोधात लढा देणार्‍या दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेटचा वापर करण्यात आल्याच्या वृत्ताने राज्यामध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान, ही बातमी देणारे पत्रकार खेतान यांनी या प्रकरणाचा तपास झाल्यास सर्व पुरावे द्यायला तयार असल्याचं सांगितले आहे.

First published: July 21, 2014, 1:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading