दाभोलकरांच्या खुनाच्या तपासासाठी घेतली तांत्रिकाचीच मदत ?

दाभोलकरांच्या खुनाच्या तपासासाठी घेतली तांत्रिकाचीच मदत ?

  • Share this:

outlook_dabhilkar07 जुलै : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 10 महिने झाल्यानंतरही अजून प्रकरणाचा सुगावा लागू शकला नाही. त्यातही दुदैर्वाची गोष्ट ही की ज्या दाभोलकरांनी अंधश्रद्धा आणि बुवाबाजी विरूद्ध आपलं आयुष्य वेचलं त्यांच्याच खूनाचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी तांत्रिकाची मदत घेतली, असा धक्कादायक खुलासा झालाय. शोधपत्रकार आशिष खेतान यांनी शोध घेऊन 'आऊटलुक' मासिकात याबाबत सविस्तर लेख लिहून दावा केला आहे.

तत्कालिन आयुक्त गुलाबराव पोळ यांनी माजी पोलीस अधिकारी रणजीत अभ्यंकर आणि मनिष ठाकूर यांची याकामी मदत घेतली, असा दावा खेतान यांनी केला आहे. अभ्यकंर आणि ठाकूर हे पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर बुवाबाजीकडे वळले. पोळ यांनी या दोघांना सरकारी गाडी पोलीस कर्मचारी आणि पैसे अशी सर्व मदत केली आणि तंत्रमंत्राच्या साह्यानं आरोपींचा काही पुरावा मिळतो का याची चाचपणी केली असा दावा खेतान यांनी केलाय.

ठाकूर यांनी दिलेल्या काही माहितीच्या आधारे काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. या आधीही या दोघांनी रेल्वे दरोड्याचा तपास करताना आपल्याला मदत केली अशी माहिती पोळ यांनी दिली असा दावाही खेतान यांनी केलाय.

First published: July 7, 2014, 5:54 PM IST

ताज्या बातम्या