प्रवेशप्रक्रियेत फर्ग्युसन कॉलेजनं दिला तृतीयपंथीयांना अधिकृत दर्जा

प्रवेशप्रक्रियेत फर्ग्युसन कॉलेजनं दिला तृतीयपंथीयांना अधिकृत दर्जा

  • Share this:

transgender03    जुलै :   सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तृतीयपंथीयांना वेगळी ओळख तर मिळाली. पण या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात केव्हा होणार हा प्रश्न होताच. याबाबत पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजने पहिलं पाऊल टाकलंय. कॉलेजने प्रवेश प्रक्रियेत तृतीयपंथीयांना अधिकृत दर्जा दिला आहे. कॉलेजच्या यंदाच्या ऑनलाईन प्रवेश अर्जामध्ये जेंडर कॉलममध्ये मेल फिमेल याबरोबरच ट्रान्सजेंडर हा पर्यायही उपलब्ध करुन दिलेला आहे. मतदार याद्यांमधल्या ओळखपत्रावरही ट्रान्सजेंडर अशी नोंद करण्याची सुविधा उपलब्ध झाली होती. पण इतर पातळ्यांवर याची अंमलबजावणी सुरु कधी होणार हा प्रश्न विचारला जात होता. याच पार्श्वभूमीवर कॉलेजने हा निर्णय घेतला आहे. तृतीयपंथ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याच्या दृष्टीने हे आश्वासक पाऊल मानलं जातं आहे. विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

First published: July 3, 2014, 10:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading