बल्ले बल्ले, 88 वं साहित्य संमेलन पंजाबमध्ये

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2014 06:24 PM IST

बल्ले बल्ले, 88 वं साहित्य संमेलन पंजाबमध्ये

guhman_samelan01 जुलै : यंदाचं 88 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे होणार यावरुन सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळालाय. यंदाचं संमेलन हे पंजाबमध्ये होणार आहे. संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधल्या घुमानमध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

याबद्दल अधिकृत घोषणा काही वेळातच पुण्यात होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची आज (सोमवारी) पुण्यात बैठक झाली. यावेळेस उस्मानाबाद, जव्हार यांच्यासह गुजरातमधील बडोद्याहूनही प्रस्ताव आला होता.

पंजाबमधील संत नामदेव गुरूद्वारातर्फे हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. भारत सासणे आणि समीक्षक श्रीपाल सबनीस यांची नावं अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत, अशी माहितीही सूत्रांनी दिलीये.

पंजाबची निवड का ?

संतशिरोमणी नामदेव यांच्या आयुष्यातला बराच मोठा काळ उत्तर भारतात गेला. विशेषत: नामदेवांच्या 20 वर्षांच्या पंजाबातील वास्तव्याची आणि कार्याची ओळख अजूनही जपली गेली आहे. नामदेवजीकी मुखबानी म्हणून प्रसिद्ध असलेली नामदेवांच्या हिंदी भाषेतल्या 61 ओव्यांचा शिखांच्या ग्रंथसाहिबात समाविष्ट करण्यात आला आहे.

Loading...

विष्णुस्वामी, बोहरदास, जाल्लो, लब्धा, केसो कलंधर यांच्यासारखे शिष्य नामदेवांना पंजाबात मिळाले. त्यापैकी जाल्लो सुतार हे शिष्य नामदेवांसोबत पंजाबमधून पंढरपूरला आले. पंजाबच्या केसो कलधारी या शिष्याने भावलपूर संस्थानात जाऊन भागवत धर्माची ध्वजा फडकवली. पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्याच्या घुमानमध्ये शीख बांधवांनी संत नामदेव यांचं वास्तव्य असल्याने त्यांचे शिष्य बोहरदास आणि एका मुस्लीम राजाने तिथे नामदेवांचं मंदिर उभारलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2014 04:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...