मतमोजणीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मतमोजणीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

  • Share this:

article-2617099-1D74AC6900000578-531_634x41615 मे :  16व्या लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी मुंबई पोलिस दल सज्ज झाले असून मतदानाच्या दिवशी शहरात अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. उद्या होणार्‍या मतमोजणीसाठी कडक पोलिस बंदोबस्ताला सुरुवात झाली आहे. केंद्रीय राज्य राखीव दलाच्या मदतीसह मतमोजणी केंद्रावर हजारो पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय मुंबईतील प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर CCTV ची करडी नजर असणार आहे.

दरम्यान, पुणे आणि मावळमध्ये उद्या मतमोजणीच्या दिवशी विजयी मिरवणुकींवर पोलिसांनी बंदी आणली आहे. 17 तारखेला पोलिसांची परवानगी घेऊन मिरवणुका काढता येतील असं ही जाहिर करण्यात आलं आहे. निकालाच्या दिवशी कोणतेही वाद होऊ नयेत यासासाठी पोलिसंनी हा निर्णय घेतला आहे.

First published: May 15, 2014, 9:37 AM IST

ताज्या बातम्या