पुण्यात MBA चे पेपर फुटले, व्हॉटसअ ॅपवर मिळाले ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 11, 2014 04:31 PM IST

पुण्यात MBA चे पेपर फुटले, व्हॉटसअ ॅपवर मिळाले ?

pune_mba_paper3611 मे : शिक्षणाचं माहेर घरं समजल्या जाणार्‍या पुण्यात एमबीएचे पेपर फुटल्याची धक्कादायक घटना घडली. पुणे विद्यापीठातल्या एमबीए प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांना पेपरच्या आदल्या दिवशीच थेट व्हॉट्सऍपवर पेपर मिळाले आहेत.

एमबीए परीक्षेचे जवळपास सर्वच पेपर लिक झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केलाय. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणार्‍या सर्व एमबीए कॉलेजेसमध्ये हे पेपर जातात. ज्या मुलांनी अभ्यास करून पेपर लिहिलाय त्यांच्यावर अन्याय का, एमबीएची परीक्षा पुन्हा घ्या, अशी मागणी विद्यार्थी करत आहे. या प्रकरणी प्रसाद वाईकर या विद्यार्थ्यांने आवाज उठवला असून आपल्या महाविद्यालयाकडे तक्रारही केलीय.

पेपर सुरू होण्याअगोदर आपले काही मित्र अमूक-अमूक विषयावर प्रश्न येईल असं सांगितलं होतं पण त्यावर आपण विश्वास ठेवला नाही मात्र त्याने जो प्रश्न सांगितला तोच प्रश्न पेपरमध्ये आला होता. काही पेपर तासाभरापूर्वीच लिक झाले तर काही पेपर आदल्यादिवशी मध्यरात्री लिक झाले आणि व्हॉटसऍपवर शेअर करण्यात आले असल्याचंही त्याने सांगितलं.

Loading...

तर पेपर फुटलेच नसून असा कोणताही प्रकार घडला नाही असा दावा पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे यांनी केलाय. सर्व प्रश्नपत्रिका ह्या ऑनलाईन पाठवल्या जातात आणि पेपर सुरू होण्याच्या अगोदरच संबंधी कॉलेजचे प्राचार्याच पेपर उघडू शकता त्यामुळे असा कोणताही प्रकार घडला नाही असं वासुदेव गाडे यांनी सांगितलं. संबंधीत विद्यार्थ्यांनी तक्रार करावी त्याची पूर्ण चौकशी केली जाईल. मागिल वर्षीही अशा प्रकारचे प्रकार घडले होते ते पेपर आपल्याप्रयत्न पोहचलेही होते पण ते पेपर दुसरेच होते असंही गाडे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2014 04:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...