विक्रांतवर शिवस्मारक उभारावं!

  • Share this:

ins vikrant09 मे :  नौदलातून निवृत्त झालेल्या आणि भंगारात काढण्यात आलेल्या आयएनएस विक्रांत या युध्दनौकेवरच छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रस्तावित स्मारक करावे असं मत शिल्पकार प्रभाकर कोल्हटकर  यांनी व्यक्त केले आहे. गुजरातमधल्या वल्लभभाई पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार म्हणून प्रभाकर कोल्हटकर प्रकाशझोतात आहेत.

अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासाठी हजारो कोटी रुपये खर्च होणार आहे. तर दुसरीकडे नौदलाने आयएनएस विक्रांत ही युध्दनौका भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे.

याविषयी प्रभाकर कोल्हटकर यांनी शिवस्मारक उभारलं तर INS विक्रांतला वाचवता येईल असं मत मांडलं आहे. त्यामुळे या युध्दनौकेचे जतनही होईल आणि शिवाजी महाराजांचे स्मारकही उभारता येईल असे त्यांनी म्हटले आहे. यातून दोन्ही उद्दीष्ट साध्य करता येतील' असेही त्यांनी सांगितले. समुद्र किनार्‍यांवरून येणार्‍या इंग्रजांना रोखण्यासाठी शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं होतं, त्यामुळे विक्रांतवर त्यांचं स्मारक करणं योग्य ठरेल असंही मत कोल्हटकर यांनी व्यक्त केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2014 02:48 PM IST

ताज्या बातम्या