दाभोलकर खून प्रकरणाची होणार सीबीआय चौकशी

दाभोलकर खून प्रकरणाची होणार सीबीआय चौकशी

  • Share this:

narendra dabholkar23 एप्रिल : डॉ.नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी चौकशी करण्याची सीबीआयने तयारी दाखवली आहेत. हायकोर्टात सीबीआयने चौकशीची तयारी असल्याचं सांगितलं. केतन तिरोडकर यांनी याविषयी याचिका दाखल केली होती. त्यावर सीबीआयने ही तयारी दाखवलीय.

20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला होता.

या प्रकरणी नागोरी गँगच्या दोन सदस्यांना अटक करण्यात आली होती. मात्र दोनच दिवसांपूर्वी या प्रकरणात नागोरी गँगच्या संशयित दोन आरोपींना जामिनावर सोडण्यात आलंय. 9 महिन्यांनंतरही दाभोलकर खून प्रकरणाचा छडा लागलेला नाही. त्यामुळे अंनिस कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होतोय.

First published: April 23, 2014, 6:33 PM IST

ताज्या बातम्या