कलमाडींचा पत्ता कट, विश्वजीत कदमांना उमेदवारी

कलमाडींचा पत्ता कट, विश्वजीत कदमांना उमेदवारी

  • Share this:

vishavjeet kadam18 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली तिसरी यादी जाहीर केलीय. उमेदवारीसाठी दिल्लीकडे डोळे लावून बसलेले कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी यांना पुन्हा उमेदवारी देण्यास स्पष्ट नकार दिलाअसून त्यांचा पत्ता कापला गेलाय.

पुण्यातून त्यांच्या जागी वनमंत्री पंतगराव कदम यांचे चिरंजिव आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम यांना उमेदवारी जाहीर झालीय. विश्वजीत कदम पुण्यातून निवडणूक लढवणार आहे. याचबरोबर चंद्रपूरमधून पालकमंत्री संजय देवतळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.

तर पालघरमधून राजेंद्र गावित यांना तिकीट देण्यात आलंय. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या लातूरमधून कुणाला उमेदवारी देण्यात येणार याबाबत चर्चा सुरू होती अखेर आज यावर पडदा पडला असून दत्तात्रय बनसोडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.

मात्र नांदेड आणि यवतमाळच्या उमेदवारीचा निर्णय काँग्रेसने जाहीर केला नाही. नांदेडमधून आदर्श घोटाळ्यातील आरोपी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण इच्छुक आहे. पण त्यांच्यावर आरोपांमुळे त्यांच्या पत्नीला तिकीट मिळण्याची उत्सुकता कायम आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा मुलगा राहुल ठाकरे यवतमाळमधून इच्छुक आहे.औरंगाबादमधून उमेदवार मिळू न शकल्यामुळे उमेदवारीचा निर्णय घेतला गेला नाही.

काँग्रेसची तिसरी यादी राज्यातून 4 उमेदवार जाहीर

  • पुणे -विश्वजीत कदम
  • चंद्रपूर - संजय देवतळे
  • लातूर - दत्तात्रय बनसोडे
  • पालघर - राजेंद्र गावित

First published: March 18, 2014, 9:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading