सरकारची 'मनसे'मदत, राज यांची सभा 'एस.पी'वर हलवली

सरकारची 'मनसे'मदत, राज यांची सभा 'एस.पी'वर हलवली

  • Share this:

raj-thackeray_350_07241210412008 फेब्रुवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात होणारी सभा आता एस पी कॉलेजच्या मैदानावर हलवण्यात आलीय. मुळा-मुठा नदीच्या पात्रात सभा होणार असं मनसेच्या पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केलं होतं.

पण राज यांना नदीपात्राताची जागा आवडली नाही त्यामुळे शुक्रवारी रात्री पोलीस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत काही बड्या नेत्यांच्या मध्यस्थीनं एस.पी. कॉलेजच्या मंडळावर दबाव आणला गेला आणि एसपी कॉलेजवर सभेला परवानगी मिळवण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिलंय. एसपी कॉलेजच्या मैदानावर सभा घेण्यासाठी मनसेचा प्रयत्न होता.

पण शिक्षण प्रसारक मंडळानं परवानगी नाकारल्यानं नाईलाजानं सभा नदीपात्रात घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शुक्रवारी मनसेकडून याबाबत जाहीरही करण्यात आलं होतं. एव्हाना आज सकाळी नदीपात्रात साफसफाईचे कामही सुरू करण्यात आले होते. मात्र एस.पी. कॉलेजच्या मैदानावर सभा व्हावी यासाठी 'वजनदार'मंत्र्यांनी सूत्रं हलवली. एस.पी.कॉलेजच्या मंडळावर दबाव टाकण्यात आला आणि सभेसाठी परवानगी घेण्यात आली. आता राज यांची सभा नदीपात्रात होणार नसून एस.पी. कॉलेजच्या मैदानावर होणार असल्याचं स्पष्ट झालंय.

First published: February 8, 2014, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading