07 फेब्रुवारी : पिपंरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांची अखेर बदली झालीय. त्यांची मुद्रांक शुल्क विभागात इन्स्पेक्टर जनरल पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलीय. स्वत: परदेशी यांनी या बातमीला दुजोरा दिलाय.
तर परदेशींच्या जागी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांची नियुक्ती करण्यात आलीय. राजकीय नेत्यांना न आवडणारे निर्णय घेतल्याने त्यांची बदली केली जाईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू होती.
याविरोधात पुण्यातल्या सामाजिक संघटनाही एकत्र आल्या होत्या. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परदेशींच्या बदलीचा कुठलाही प्रस्ताव नाही, असं सांगितलं होतं. तरीही अखेर आज त्यांची बदली करण्यात आली आहे.
श्रीकर परदेशींची कारकीर्द
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा