राज ठाकरेंचा ताफा येताच टोल नाके बंद

राज ठाकरेंचा ताफा येताच टोल नाके बंद

  • Share this:

raj toll 3430 जानेवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावर राज्यभरात मनसेसैनिकांनी टोल तुडवले. मात्र आज खुद्द राज ठाकरे पुण्याला निघाले असता त्यांच्या येण्याची चाहुल लागताच कोणताही 'राडा' नको म्हणून टोल नाका काही वेळासाठी बंद करण्यात आला होता. राज यांच्या ताफ्याने मुंबई ते पुणे टोल न भरताचा प्रवास केला.

राज ठाकरे आज सकाळी पुणे दौर्‍यासाठी मुंबईहून पुण्याला निघाले. मुंबईतून बाहेर पडत असताना वाशी टोल नाका लागतो. राज यांच्या गाड्यांचा ताफा येणार हे कळताच टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांनी टोल नाका बंद केला. राज यांचा ताफा गेल्यानंतर काही वेळानंतर टोल नाका पुन्हा सुरू करण्यात आला. मागील रविवारी वाशी इथंच मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं त्यावेळी राज यांनी टोल भरु नका टोल तुडवून काढा असे आदेश दिले होते.

त्यानंतर राज्यभरात मनसेसैनिकांनी टोल नाक्यांची तोडफोड केली. मनसेसैनिकांनी टोल फोडल्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात किंवा बंदोबस्त न घेता टोलनाके पुन्हा सुरू झाले आहे. तसाच प्रकार राज यांच्यासोबत ही झाला. आज दुपारी राज ठाकरे चार दिवसांच्या दौर्‍यासाठी पुण्यात दाखल झालेत.पुण्यातल्या प्रभात रोडवरच्या राजमहाल या घरी पोहोचले. पण त्यांना अटक होण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्या अटकेवरून राज्य सरकार आणि पोलिसांमध्ये टोलवाटोलवी सुरू आहे. राज्य सरकारन ही जबाबदारी पोलिसांवर ढकललीय. राज ठाकरेंच्या चिथावणीखोर भाषणाचा अहवाल विधी आणि न्याय विभागाकडून गृहविभागाकडे येत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाईची शक्यता धूसर आहे.

First published: January 30, 2014, 5:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading