दाभोलकर खून प्रकरणी दोघांना अटक

दाभोलकर खून प्रकरणी दोघांना अटक

  • Share this:

narendra dabholkar 320 जानेवारी :डॉ.नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात पोलिसांना अखेर यश मिळालंय. मनिष नागोरी आणि विकास खंडेलवाल असं या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. दाभोलकरांच्या खुनासाठी वापरण्यात आलेल्या बंदुकीच्या बॅलेस्टिक रिपोर्टच्या आधारावर या दोघांना अटक करण्यात आलीय. हे दोघेही नागोरी गँगचे सदस्य आहे. हे दोघेही खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटकेत आहेत. दाभोलकर यांच्या खुनाच्या कटात सहभागी असल्याचा आरोपावरुन दोघांना अटक केलीय. उद्या (मंगळवारी) दोघांनाही शिवाजीनगर कोर्टात हजर करणार आहे.

अशी झाली अटक ?

20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडलेल्या डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यावर दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला. दाभोलकर यांच्यावर ज्या पिस्तुलीने गोळ्या झाडण्यात आल्या त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला होता. ज्या दिवशी दाभोलकरांचा खून झाला त्या दिवशीच मुंब्रा पोलिसांनी मनीष रामविलास नागोरी, राहुल माळी, विकास खंडेलवाल, संतोष ऊर्फ सनी बगाडे यांना ठाण्यातून खुनाच्या गुन्ह्यात अटक केली होती.

त्यांच्याकडून काही पिस्तुलं जप्त करण्यात आली. ही पिस्तुलं बॅलेस्टिक एक्सपर्टकडे पाठवण्यात आली होती. बॅलेस्टिक रिपोर्ट आधी एटीएएसकडे आला त्यानंतर हा रिपोर्ट एटीएसनं पुणे पोलिसांकडे पाठवला. या रिपोर्टवरुन संशय घेऊन पुणे पोलिसांनी नागोरी गँगचे सदस्य मनिष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांना अटक केली. दाभोलकरांच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या नागोरी गँगकडून जप्त करण्यात आलेल्या प्रकारच्या पिस्तुलातून झाडण्यात आल्या असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. या संशयावरून अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान विकास खंडेलवाल आणि मनीष नागोरी ऊर्फ मन्या ऊर्फ राजूभाई या दोघांनी पुणे विद्यापीठातल्या वॉचमनचा खून केल्याचं उघड झालंय. बॅलेस्टिक रिपोर्टवरून दाभोलकरांच्या खुनाच्या कटात नागोरी गँगचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय. त्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. उद्या या दोघांना शिवाजीनगर कोर्टात हजर करणार आहे.

First published: January 20, 2014, 9:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading