दाभोलकर खून प्रकरणात सरकार हात झटकतंय -मुक्ता दाभोलकर

दाभोलकर खून प्रकरणात सरकार हात झटकतंय -मुक्ता दाभोलकर

  • Share this:

mukta dabholkar18 जानेवारी : डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणापासून राज्य सरकार हात झटकतंय असा घणाघाती आरोप नरेंद्र दाभोलकर यांची मुलगी आणि अंनिसची कार्यक र्त्या मुक्ता दाभोलकर यांनी केलाय.

या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे संकेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. हवं तर पुणे पोलिसांच्या नेतृत्त्वात बदल करा पण दाभोलकर यांच्या हत्येचा तपास राज्य पोलिसांनीच लावावा असं मुक्ता यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, 20 जानेवारीला सर्व सरकारी कार्यालयांवर संताप मोर्चा काढणार आहोत, असं अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितलंय. यात राज्यपालांनी लक्ष घालावं अशी मागणीही त्यांनी केली.

First published: January 18, 2014, 8:41 PM IST

ताज्या बातम्या