पुणे रिंग रोडला हिरवा कंदील

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 16, 2014 09:31 PM IST

पुणे रिंग रोडला हिरवा कंदील

pune ring road16 जानेवारी : अनेक वर्षांपासून कागदावर असेलल्या पुणे रिंग रोडला राज्य मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दिलाय. बुधवारी संध्याकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सोयीसुविधा विषयक उपसमितीची बैठक झाली. त्यात हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय प्रलंबित असलेल्या वांद्रे - वर्सोवा सी लिंकला देखील राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पुणे रिंग रोडच्या प्रश्नावरुन गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

पुणे शहराची वाहतूक कोंडी सोडवण्याचा उत्तम पर्याय असलेल्या पुणे रिंग रोडसंदर्भात राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांवर वारंवार दबाव येत होता.

असा आहे रिंग रोड प्रकल्प

Loading...

 • एकूण लांबी- 161.73 किमी
 • एकूण खर्च- 104.08 अब्ज रुपये
 • एकूण लेन- 6
 • सर्व्हिस लेन्स- दोन्ही बाजूंना दोन
 • उड्डाण पूल- 12
 • रेल्वे पूल- 4
 • पूल- 7 दर्‍याखोर्‍यांना जोडणारे
 • सबवे - 14
 • बोगदे - 13

असा आहे वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्प

 • - MSRDC च्या अंदाजानुसार प्रवासाची 45 मिनिटे वाचतील
 • - वर्सोवा-वांद्रे सी लिंकमुळे 14 सिग्नल्स टाळता येतील
 • - संपूर्ण प्रकल्पाची खोली 1500 मीटर
 • - सी लिंकची अंदाजे लांबी 9.3 किलोमीटर
 • - तीन बाजूंनी जोडलेल्या रस्त्यांसह बांधल्या जाणार्‍या रस्त्यांची एकूण लांबी- 16 किलोमीटर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2014 09:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...