07 डिसेंबर : नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी दोन संशयितांना गोव्यातून ताब्यात घेण्यात आलंय. शुक्रवारी दुपारी या दोघांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.
पुणे विद्यापीठाचे सुरक्षारक्षक प्रल्हाद जोगदंडकर यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी मनीष नागोरीसह चौघांना अटक केलीय. त्यांची चौकशी केली असता पुणे पोलिसांना, प्रल्हाद जोगदंडकर आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनात एकाच प्रकारचं पिस्तुल वापरलं गेल्याचं उघड झालंय.
मनीष नागोरीने 47 जणांना शस्त्र पुरवल्याचंही स्पष्ट झालंय. त्यामुळे त्यानंच डॉ. दाभोलकरांच्या मारेकर्यांना शस्त्र पुरवल्याचा संशय पोलिसांना आहे. याआधारे पोलिसांनी ही कारवाई केल्याचं समजतंय.
दरम्यान, दाभोलकर कुटुंबीयांना धमकीचं पत्र आलंय. दाभोलकर यांचा मुलगा हमीद यांनी ही माहिती दिलीय. जादूटोणाविरोधी कायद्याच्या मंजुरीसाठी राज्यभरातून अंनिसला जो प्रतिसाद मिळतोय तो पाहून चिडलेल्या लोकांनी हे पत्र पाठवल्याचं हमीद यांनी सांगितलंय. ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.