संजूबाबाला पुन्हा पॅरोलवर महिनाभर सुट्टीला 'मान्यता'

संजूबाबाला पुन्हा पॅरोलवर महिनाभर सुट्टीला 'मान्यता'

  • Share this:

sanjay dutt06 डिसेंबर : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगणार बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्तला पुन्हा एकदा पॅरोलवर महिन्याभराची सुट्टी मिळाली आहे. संजयची पत्नी मान्यता दत्त आजारी असल्यामुळे त्याला महिन्याभराचा पॅरोल मंजूर करण्यात आलाय. एक महिन्यापूर्वीच संजय महिन्याभराची रजा संपवून तुरुंगात दाखल झाला होता. आता पुन्हा महिन्याभरातच संजय पॅरोलवर तुरुंगाच्या बाहेर येणार आहे.

1993 बॉम्बस्फोट प्रकरणात अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा झालीय. संजय दत्त पुण्यातील येरवडा तुरुंगात आपली शिक्षा भोगत आहे. तुरुंगात दाखल होऊन संजयला सहा पूर्ण झाले त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात वैद्यकीय कारणासाठी संजय 14 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. बाहेर आल्यानंतर संजयने 14 दिवस आपल्या कुटुंबासोबत घालवले मात्र 14 दिवसांची सुट्टी संपत आल्यावर संजयने पुन्हा 14 दिवसांची सुट्टी मागितली आणि तिही मंजूर झाली.

30 ऑक्टोबर रोजी संजय महिन्याभराची सुट्टी संपवून तुरुंगात दाखल झालाय. मात्र एक महिना उलटत नाही तोच संजयला पुन्हा महिन्याभरासाठी सुट्टी मिळालीय. यावेळी संजयची पत्ती मान्यता आजारी असल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे संजय जेंव्हा जेंव्हा बाहेर आला तेंव्हा तेंव्हा तुरुंगातून संजयच्या सुटकेवर छुपेपर्यंत झाले आहे. मागिल वेळा संजय पॅरोलवर बाहेर असताना केंद्राने संजयची शिक्षा कमी करता येईल का असं मत राज्य सरकारला मागवलं होतं. माजी न्यायाधीश आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्केडेय काटूज यांनी राष्ट्रपतींना संजयची शिक्षा माफ करावी असं पत्र लिहलं होतं. या पत्राबाबत केंद्राने आता राज्य सरकारकडे चेंडू टोलावलाय. राज्य सरकारने संजयच्या शिक्षेबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा यावर चर्चा होणार की निर्णय घेतला जाणार हे पाहण्याचं ठरले.

First published: December 6, 2013, 8:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading