पुणे पोलीस आयुक्त पोळ यांच्या अटकेचे आदेश

पुणे पोलीस आयुक्त पोळ यांच्या अटकेचे आदेश

  • Share this:

Image gulabrao_poal_300x255.jpg25 नोव्हेंबर : पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराब पोळ यांना जोरदार धक्का बसलाय. पोळ यांना 28 जानेवारी 2014 पर्यंत अटक करून हजर करण्यात यावं असे आदेश राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहे. गुलाबराव पोळ यांनी आयोगाच्या आदेशाचं पालन न केल्याबद्दल हे आदेश देण्यात आले आहे.

2007 मध्ये पुण्याच्या किशन नामदेव गोडके यांच्या मुलाचं अपहरण झालं होतं. किशन गोडके यांच्या मुलाचं अपहरण काही व्यक्तींनी केलं होतं. त्यांनी मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती, मात्र पोलिसांनी त्याचा तपास करण्यात दिरंगाई केली होती. किशन गोडके हे अनुसूचित जातीचे आहेत.

या प्रकरणी गोडके यांनी मानवाधिकार आयोगाकडे दाद मागितली होती. जानेवारी 2013 मध्ये नागपूरमध्ये भरलेल्या ओपन हिअरिंग ऑन शेड्युल्ड कास्ट्समध्ये हे प्रकरण सुनावणीसाठी आलं. मात्र, त्यावेळी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांना अहवाल सादर करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. त्याकडेही पोळ यांनी दुर्लक्ष केलं.

त्यानंतर त्यांना मे 2013 विनाशर्त आणि जून 2013 सशर्त समन्स बजावण्यात आलं. त्यामध्ये त्यांना संबंधित अपहरण प्रकरणावर अहवाल घेऊन हजर व्हायला सांगितलं होतं. त्याकडंही पोलीस आयुक्तांनी दुर्लक्ष केलं होतं. त्यानंतर आयोगानं त्यांच्या अटकेचे आदेश दिले.

First published: November 25, 2013, 4:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading