Elec-widget

ज्येष्ठ समाजसेवक मोहन धारिया यांचं निधन

ज्येष्ठ समाजसेवक मोहन धारिया यांचं निधन

 • Share this:

mohan dhariya14 ऑक्टोबर : ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक माजी केंद्रीय मंत्री आणि वनराईचे संस्थापक मोहन धारिया यांचं पुण्यात निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. मोहन धारिया किडनीच्या आजाराने त्रस्त होते. गेले दोन दिवस धारिया यांच्यावर पुण्यातल्या पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

 

त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी 2 ते 3 या वेळात राहत्या घरी ठेवण्यात आले. त्यानंतर दुपारी 3 ते 5 या वेळात धारिया यांचं पार्थिव वनराई मध्ये ठेवण्यात येणार आहे. आणि संध्याकाळी 5 नंतर वैकुंटात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार येणार आहेत. धारिया यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचं नेत्रदान करण्यात आलंय

 

. रविवारी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोहन धारियांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. धारिया वयाच्या 17 व्या वर्षी म्हणजेच 1942 साली स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. 1957 ते 60 च्या दरम्यान धारियांनी पुणे महानगर पालिकेचे सदस्य म्हणून काम पाहिले.

Loading...

 

1975च्या आणीबाणीच्या काळात त्यांनी आणीबाणीला आपला प्रखर विरोध दर्शवत मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. 1982 रोजी त्यांनी वनराई या संस्थेची स्थापना केली. 2006 पासून वनराईचे फाऊंडेशन मध्ये रुपांतर करण्यात आलं.

 

मोहन धारिया यांचा अल्प परिचय

 • - जन्म - महाड तालुक्यातलं नाते गाव

  - शिक्षण - कोकण शिक्षण संस्था, फर्ग्युसन कॉलेज

  - कॉलेजसोडून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी

  - दोन वेळा लोकसभेमध्ये

  - दोन वेळा राज्यसभेमध्ये

  - 1971 मध्ये राज्यमंत्री

  - त्यानंतर मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात वाणिज्य मंत्री

  - नियोजन आयोग उपाध्यक्ष

  - 'वनराई' या संस्थेच्या माध्यातून पर्यावरण रक्षणासाठी काम

  - 'साधना' चे विश्वस्त म्हणुनही काम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2013 05:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...