जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / मोठी बातमी! पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमधील अवैध किडनी रॅकेट प्रकरणात चौकशी समितीची नेमणूक

मोठी बातमी! पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमधील अवैध किडनी रॅकेट प्रकरणात चौकशी समितीची नेमणूक

रुबी हॉल हॉस्पिटल

रुबी हॉल हॉस्पिटल

पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमधील अवैध किडनी रॅकेट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 21 जुलै, चंद्रकांत फुंदे : पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमधील अवैध किडनी रॅकेट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून या चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी उच्च न्यायलयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रकांत भडंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश    पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटमधील अवैध किडनी रॅकेट प्रकरणाची आता चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी उच्च न्यायलयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रकांत भडंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अवयव प्रत्यारोपणातील तज्ज्ञांजाही समावेश आहे. तीन महिन्यांचा कालावधी  सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नियुक्त करण्यात आलेली ही समिती सर्व आरोपांची सखोल चौकशी करून त्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणार आहे. चौकशीदरम्यान काही अनियमितता आढळून आल्यास त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी करवयाच्या उपाययोजनांची शिफारसही समितीकडून केली जाणार आहे. या समितीला चौकशीसाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune , pune news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात