बाप रे बाप, कोब्रा नागाने गिळला दुसरा साप; पाहा हा पुण्यातला थरारक VIDEO

बाप रे बाप, कोब्रा नागाने गिळला दुसरा साप; पाहा हा पुण्यातला थरारक VIDEO

पुणे येथील सिंहगड पायथ्याशी काही सर्प मित्रांनी हा व्हिडिओ काढला आहे. जो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.

  • Share this:

आनिस शेख, प्रतिनिधी

पुणे, 06 जुलै : साप म्हटलं तर कुणाचाही थरकाप उडतो. साप समोर आल्यावर हालचाल करू नये, असं सांगितलं तरी साप  समोर दिसताच माणूस जिवाच्या आकांताने धावत सुटतो. सापाने उंदीर, मांजराला आपलं भक्ष्य केल्याचं आजपर्यंत तुम्ही पाहिलं, ऐकलं असेल पण एका सापाने दुसऱ्या सापाला कधी गिळल्याचं तुम्ही पाहिलंय का? नाही ना, पण असा एका व्हिडिओ समोर आला आहे.

भुकेल्या स्पेक्टिकल कोब्रा(नाग) या जातीच्या विषारी सापाने त्याच जातीच्या सापाला भक्ष बनवून गिळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.  पुणे येथील सिंहगड पायथ्याशी काही सर्प मित्रांनी हा व्हिडिओ काढला आहे. जो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.

या व्हिडिओमध्ये एका सापाने दुसऱ्या सापाला जिवंत गिळल्याचं या व्हिडिओ स्पष्ट दिसत आहे.  जेव्हा या मोठ्या सापाने गिळण्यास सुरुवात केली होती. तेव्हा या लहानश्या सापाने फारसा प्रयत्न केला नाही. पण, जेव्हा आता आपण पूर्णपणे या सापाच्या पोटात जाणार आहोत, हे समजल्यावर तोंडाशी आल्यावर या लहान सापाने मोठ्या सापाच्या तोंडाला चावा घेतला.  स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने  या लहान सापाने सापाला जोरात हल्ला केला. पण मोठ्या सापाच्या तावडीतून याची काही सुटका झाली नाही. अखेर या मोठ्या सापाने पूर्णपणे साप गिळला.

पण म्हणता ना, लहान तोंडी मोठा घास कधी घेऊ नये, असाच काहीसा प्रकार या सापासोबत झाला. मोठ्या सापाने लहान सापाला गिळल्यानंतर पचवू शकला नाही, तेव्हा त्याने या सापाला बाहेर काढलं.

लहान साप दुसऱ्या सापाच्या तोंडून जेंहा बाहेर पडला तेव्हा जिवंत होता. त्यानंतर सर्पमित्रांनी या दोन्ही सापाला वेगवेगळे करून सुखरुपपणे जंगलात सोडून दिले.

संपादन - सचिन साळवे

Published by: sachin Salve
First published: July 6, 2020, 1:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या