Home /News /pune /

पुण्यात आणखी एक परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

पुण्यात आणखी एक परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

पुणे शहरातील आणखी एक परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

पुणे, 24 जून : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्याच्या इतर भागांप्रमाणेच पुणे शहरातही कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली आहे. लॉकडाऊनच्या काळात ग्रीन झोन असलेले परिसर आता मात्र कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहेत. अशात पुणे शहरातील आणखी एक परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. शहरातील बी.टी. कवडे रस्ता आणि परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र अर्थात मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. 26 ते 30 जूनपर्यंत या परिसरात सकाळी 7 ते 9 दूध विक्रीला परवानगी असेल, तर सकाळी 9 ते 7 दवाखाने आणि औषधाची दुकाने खुली राहतील. बी.टी. कवडे रस्ता केवळ माल वाहतूक आणि अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्या वाहतुकीसाठी खुला राहील, अशीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुण्यात आज काय आहे कोरोनाची स्थिती? - दिवसभरात 501 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात 155 रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात 17 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू. - 277 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 56 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 13654. (डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-12894 आणि ससून 760) - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 5009. - एकूण मृत्यू -545. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- 8100 - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 3416. पुण्यात 1 लाख अँटीजेन किट्सच्या खरेदीचा निर्णय कोरोनाचे निदान तातडीने व्हावे, यासाठी 1 लाख अँटीजेन किट्स खरेदीचा निर्णय आपल्या पुणे महापालिकेने घेतला आहे. या किटमुळे अवघ्या अर्धा तासाच्या आत कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त होतो. यामुळे कमी कालावधीत रुग्णांचे निदान होण्यास मदत होणार आहे. पुढील प्रक्रिया तातडीने करुन प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे दररोज 500 ते 1000 स्वाब टेस्ट खासगी लॅबकडून करुन घेण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे.
First published:

Tags: Lockdown, Pune news

पुढील बातम्या