सातारा, 29 मार्च : साताऱ्यातील कोयनानगर येथील कोयना बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लिपिक संतोष बंडू कुंभार यांनी शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोष हे जून 2020 मध्ये जलसंपदा विभागातील कोयना बांधकाम विभागात लिपिक पदावर कामास सुरुवात केली होती. (Another government employee commits suicide in Maharashtra)
संतोष यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून कोयनानगर पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात आत्महत्येच्या घटना वारंवार समोर येत आहे. अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर देशात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा साताऱ्यातील कोयनानगर बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
हे ही वाचा-धक्कादायक! कंडक्टरने एसटीमध्येच संपवला जीव, 'या' भीतीमुळे केली आत्महत्या
काही दिवसांपूर्वी अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत RFO (परिक्षेत्र अधिकारी) दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्य जीव परीक्षेत्रात त्या गेल्या दीड वर्षापासून RFO (वनपरिक्षेत्र अधिकारी) या पदावर कार्यरत होत्या. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर तिची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस तपास करत आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.