पुणे, 15 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या पिंपरी-चिंचवड भागात राहणाऱ्या 6 वर्षांची तंजीला जेव्हा आपल्या कुटुंबासमवेत मुंबईला गेली तेव्हा तिथल्या मॉलमध्ये लहान मुलांचा टॉय कार तिला खूप आवडली. लहानगी तंजीला तिच्या वडिलांकडे गाडीसाठी हट्ट करू लागली. तंजीलाचे वडील जावेद शेख (वय 31) यांनी बाजारात या कारची चौकशी केली. त्या कारची किंमत 60000 रुपयांपर्यंत होती. कारच्या किमतीपेक्षाही जावेद यांना ती कार चिनी असल्याची बाब अधिक खटकली.
जावेद आणि त्यांचे 55 वर्षांचे वडील हुसेन शेख हे चिनी उत्पादन वापरण्याच्या विरोधात आहेत. विशेषत: सीमेवर काही दिवसांपूर्वी चिनी सैन्याने केल्या हल्ल्यानंतर त्यांनी चिनी वस्तू खरेदी करण्यास विरोध केला होता. या व्यतिरिक्त चीनने कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी ज्या प्रकारे वागणूक दिली आणि जगभरातील टीकेची पर्वा केली नाही, त्यामुळे वडील-मुलाचे मनही अस्वस्थ झाले. म्हणूनच त्यांचा पूर्ण भर ‘मेक इन इंडिया प्रॉडक्ट्स’ खरेदी करण्यावर दिला आहे.
तर दुसरीकडे तंजीलाने कार खरेदी करण्याचा बालहट्ट केला होता. तिला तीच रस्त्यावर चालणारी चमकती, सॉफ्ट सीट्स असलेली आणि ऑटोमेटिक कार हवी होती. दोघांनी ठरवलं की ते चायनीज प्रोडक्ट खरेदी करणार नाहीत मात्र लाडक्या तंजीलाला निराश होऊ देणार नाही. जावेद हे स्वत: ऑटोमोबाइल रिपेअर गॅरेज चालवतात. येथे कार दुरुस्तीबरोबरच पेंटिगचेही काम केले जाते. जावेद यांच्यानुसार त्यांनी शहरातील एका मोठ्या कार रिपेअर आणि मेंटन्सस हाऊसमध्ये 10 वर्षे काम केलं आहे. त्यामुळे जावेदने आपल्याच हाताने लेकीसाठी कार तयार करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा त्यांनी एका कागदावर कारचं स्केच तयार केलं. त्यानंतर जावेदने कारसाठी आवश्यक सर्व वस्तू जमा केल्या. लॉकडाऊनचे दिवस होते. यामुळे कार तयार करण्यासाठी जावेद आणि त्यांच्या वडिलांकडे बराच रिकामा वेळ होता. यासाठी दोघांनीही संपूर्ण लक्ष कार तयार करण्यावर केंद्रीत केलं.
तंजीलाच्या स्वप्नांची कार तयार करण्यासाठी टू व्हिलरचं इंजिन लावण्यात आलं. शॉक अब्जॉर्वर्स, पॉवरफूल लाइट्स आणि मऊ कुशन असणारी सीट, बॅटरी, स्टेअरिंगसह तयार झाली टॉय करा. पाहताना या कारचं डिजाईन सुंदर अशा विंटेज कारसारखं दिसतं. पिंपरी-चिंचवडमध्ये जो कोणी ही कार पाहतो ते या कारचं खूप कौतुक करतात. लहानग्यांना तर यात बसायला खूप आवडतं, याशिवाय वृद्ध देखील या गाडीत बसू शकतात.
जावेदने सांगितले की, ते या छोट्याशा कारमधून घरासाठी लागणारी भाजी किंवा किराणा या गाडीत बसून घेऊन येतात. तंजीलादेखील ही कार मिळाल्यामुळे खूप खूष आहे. याशिवाय जावेद यांनी दुसऱ्यांनीही आपल्या मुलांसाठी अशी कार तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. सध्या ते स्कूटी टू व्हिलर इंजनाचा वापर टॉय कारमध्ये करीत आहेत. मात्र येत्या काळात ही कार बॅटरीने ऑपरेशट व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहेत. यासाठी कमी वजनाच्या बॅटरीबरोबरच चार्जिंगसाठी कमी वेळ घेणाऱ्या बॅटरीचा शोध घेतल आहेत.