पुण्यातील एक आदर्शगाव; येथे होत नाही पाणी कपात; आत्मनिर्भर होत अशी बदलली परिस्थिती

पुण्यातील एक आदर्शगाव; येथे होत नाही पाणी कपात; आत्मनिर्भर होत अशी बदलली परिस्थिती

एकेकाळी या गावकऱ्यांना डोंगरावर चढून पाणी आणावं लागत होतं...

  • Share this:

पुणे, 23 ऑगस्ट :   पुण्यातील उगलवाडी गावात 927 मीटर उंचावर स्थित भोजनवाड़ी येथे मोठी वस्ती आहे राहतात. येथे तब्बल 40 कुटुंबीय वास्तवास आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथे पाणीसंकट होतं, परिणामी महिलांना स्वच्छ पाणी मिळविण्यासाठी पायपीट करावी लागत होती. मात्र उगलवाडीतील परिस्थिती आता बदलली आहे. येथे आता नळातून पाणी मिळण्याची व्यवस्था सुरू झाली आहे.

नदीतून आलेलं पाणी पंपाने वरपर्यंत पोहोचवलं जात आहे आणि वर एका तलावात भरलं जातं. जेथून त्याला मुख्य गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवलं जातं. यापूर्वी भोजनवाडी घरातील पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी शिवकालीन टँक योजनाअंतर्गत डोंगरावर तयार केलेल्या तलावांवर अवलंबून होता. उन्हाळ्याच्या दिवसात गावकऱ्यांना उन्हातून पायी जात पाणी भरून आणावे लागत होते. गावकऱ्यांना पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी 500 मीटरवर डोंगर चढावा लागत होता.

बऱ्याच काळासाठी पाणीसंकटाचा सामना केल्यानंतर शेवटी आणि रामदास आणि त्यांच्या सोबतच्या अन्य लोकांनी ही योजना तयार केली.

यामुळे वस्तीजवळ 5000 लीटर पाण्याच्या क्षमतेचा तलाव तयार करण्यात आला. गावापर्यंत पाणी आणण्यासाठी शिवकालीन टँकपासून सायफन पद्धतीने तलावात पाणी आणण्यात आलं आणि याला नळाच्या माध्यमातून सर्व 40 घरांपर्यंत पोहोचविण्याची सोय करण्यात आली. तलावाची साठवण्याच्या क्षमतेत सुधारणा करण्यासाठी यूनीसेफ-मुंबई समर्थिक आशा की बूंदे आणि जल जीवन मिशनच्याअंतर्गत याची डागडूजी करण्यात आली. गावातील लोक गरजेनुसार पाण्याचा वापर करतील यासाठी रामदास यांनी काही लोकांना एकत्रित करीत जागरुकता निर्माण केली. यानंतर गावकरी नियमांचे पालन करीत तलावाची पाण्याचा वापर करतात. यामुळे या गावकऱ्यांना पायपीट करावी लागत नाही आणि वर्षभर पाणी उपलब्ध होतं.

Published by: Meenal Gangurde
First published: August 23, 2020, 5:10 PM IST

ताज्या बातम्या