वंदे मातरम, योगा सक्तीवरून अमोल पालेकरांनी दिले शालजोडीतले

वंदे मातरम, योगा सक्तीवरून अमोल पालेकरांनी दिले शालजोडीतले

अभिनेता अमोल पालेकरांनी वंदे मातरम,लव्ह जिहाद, एअर इंडियाने शाकाहाराची केलेली सक्ती,पंचगव्य अशा अनेक विषयांचा समाचार घेतला.

  • Share this:

हलिमा कुरेशी, 13 आॅगस्ट : पुण्यात आज सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने  ' सामाजिक एकात्मतेचे विविध पैलू'  या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होत. या उद्घाटन प्रसंगी अभिनेता अमोल पालेकरांनी वंदे मातरम,लव्ह जिहाद, एअर इंडियाने शाकाहाराची केलेली सक्ती,पंचगव्य अशा अनेक विषयांचा समाचार घेतला.

दिवसाढवळ्या सनदी मार्गाने हत्या होत असल्याचा आरोप त्यांनी केला. वंदे  म्हणायला अवघड असलं तरी माझ्या भाषेत नसाल तरी म्हणायलाच पाहिजे ,योगा देखील आरोग्याला हितावह असतो मग तुम्ही त्याच्या सक्तीला हिंदुत्वाचा अजेंडा का म्हणता , काहीही खाण्याचं स्वातंत्र्य आहे मग एअर इंडियाने शाकाहाराची सक्ती कशाला .

बहुधर्मिकता,धार्मिक स्वायतत्ता अशा संकल्पनांचा अर्थ बदललेल्या नव्या संदर्भात लावण्याचे काम सुरू असल्याचा आरोप अमोल पालेकरांनी केला.

अशा या सगळ्या प्रसंगी आपण अस्वस्थ,संवेदनशील असन गरजेचं असल्याचं  पालेकरांनी म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2017 02:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading